पुणे - "स्वाइन फ्लू'चे सावट असतानाही "गणपती बाप्पा मोरया'चा जल्लोष आणि पारंपरिक उत्साहात आज (रविवार) विघ्नहर्त्या गणरायाचे पुण्यात उत्साही वातावरणात आगमन झाले. माध्यान्हीपूर्वी मानाच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
ग्रामदैवत श्री कसबा गणपती या मानाच्या पहिल्या गणपतीची प्रतिष्ठापना सकाळी 11 वाजता स्वामी मकरंदनाथ यांच्या हस्ते झाली. तत्पूर्वी, सकाळी साडेआठपासून मिरवणूक लाल महाल, अप्पा बळवंत चौक, लोखंडे तालीम चौक, पत्र्या मारुती, लक्ष्मी रस्ता, जोगेश्वरी चौक या मार्गाने काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये कोणत्याही पथकाचा समावेश नव्हता. स्वाइन फ्लूबाबत जागृती करणारे फलक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हातात धरले होते.
ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक मंडळाची मिरवणूक सकाळी दहा वाजता काढण्यात आली. मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते जयंत सावरगावकर यांच्या हस्ते दुपारी बारा वाजता श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. शिव मुद्राचे ढोलपथक मंडळाच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते.
[सकाळ वृत्तसेवा
No comments:
Post a Comment